धुळे – सोलापूर महामार्गावर फतियाबाद येथे दुचाकी अपघात, दोन जण जखमी

Foto
 
धुळे – सोलापूर महामार्गावर फतियाबाद येथे दुचाकी अपघात दोन जण जखमी
माळीवाडा, (प्रतिनीधी) : धुळे
-सोलापूर महामार्गावर फतियाबाद येथील नवीन एचपी पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (दि. २१) रोजी ऑक्टोबर सायंकाळी सुमारे ५ वाजच्या सुमारास दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.
-रस्त्यावरील खड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी (एमएच २० जी जे ०९४४) या क्रमांकाच्या पल्सर दुचाकीचा समतोल बिघडून ती घसरली. अपघातग्रस्तांमध्ये साहेबराव दामोधर धोत्रे (वय ५५) व त्यांचा नातू शस्विन धोत्रे (वय ३), दोघेही (रा. पडेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच माळीवाडा परिसर पॉईंट जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानची मोफत अॅम्ब्युलन्स सेवा, घटनास्थळी पोहोचली व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
0944
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions